आमची वैशिष्ठये

आठवड्याचे सातही दिवस विन्रम व तत्पर सेवा

इतर आकर्षक ठेव योजना

ठेवीवर अधिक व्याज दर

जेष्ठ नागरिकांना 0.२५% जादा व्याजदर

विविध कर्ज योजना

ठेवीवर ८0% कर्ज

दरवर्षी १५% लाभांश देणारी पतसंस्था

संपूर्ण संगणकीकृत कामकाज

सतत ऑडीट ‘अ’ वर्ग

स्वमालकीचे अद्यावत कार्यालय
मुखपृष्ठ


प्रवरा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.,रोहा. ही रायगड जिल्हयातील एक अग्रगण्य सहकारी पतसंस्था आहे. संस्थेची स्थापना १९९५ रोजी वरसे येथे करण्यात आली. मुख्यतः रोहा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारया लोकांनी संस्थेची स्थापना केली. पतसंस्थेने २२ वर्षाच्या प्रवासामध्ये सहकार क्षेत्रात आपले प्रभावी स्थान बनविले आहे. पतसंस्था अनेक वर्षांपासून तिच्या विन्रम, तत्पर आणि प्रामाणिक सेवेसाठी प्रसिध्द आहे.

सहकार चळवळीचा उगम हा सर्वसामान्य माणसाला आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने झाला. आज सहकारी पतसंस्था ह्या सामान्य माणसाला कर्ज पुरवठा करणारया महत्वपूर्ण वित्तसंस्था झाल्या आहेत. याच अनुषंगाने प्रवरा पतसंस्था ही रोहा व परिसरातील जिव्हाळ्याची पतसंस्था झाली आहे.

आजवरच्या वाटचालीत संस्थेने स्थापनेपासून सतत ऑडीट वर्ग ‘अ’ मिळविला आहे. सभासदांना दरवर्षी १५% लाभांश दिला आहे. तसेच दरवर्षी ९९% पेक्षा जास्त कर्जवसुली हे संस्थेचे वैशिष्ठय आहे.

संस्थेने आज पर्यंत हजारो सभासदांना विविध कारणांसाठी आर्थिक पुरवठा केलेला आहे. सभासदांची उन्नती त्यांचा विकास होवो हेच संस्थेचे ध्येय आहे आणि सभासदांनी घेतलेली कर्ज वेळेत परत करणे हिच संस्थेची प्रगती आहे. आज प्रवरा पतसंस्था सर्वाधिक लोकप्रिय पतसंस्था आहे.

ग्राहकांना अचूक व तत्पर सेवा देण्याच्या उद्देशाने संस्थेचे दैनंदिन कामकाज संपूर्ण संगणकीकृत केले आहे. अशी सर्वांगिण प्रगती केल्यामुळेच जनमानसात संस्थेने विशेष स्थान निर्माण केले आहे.
तुमच्या कॉम्प्युटर स्क्रिनचा दिसण्याचा आकार आहे.
तर हे संकेतस्थळ या आकारामध्ये बनविले आहे.
प्रवरा ग्रा.स.पतसंस्था. © साईट वरील सर्व हक्क राखिव आहेत.