आमची वैशिष्ठये

आठवड्याचे सातही दिवस विन्रम व तत्पर सेवा

इतर आकर्षक ठेव योजना

ठेवीवर अधिक व्याज दर

जेष्ठ नागरिकांना 0.२५% जादा व्याजदर

विविध कर्ज योजना

ठेवीवर ८0% कर्ज

दरवर्षी १५% लाभांश देणारी पतसंस्था

संपूर्ण संगणकीकृत कामकाज

सतत ऑडीट ‘अ’ वर्ग

स्वमालकीचे अद्यावत कार्यालय
अध्यक्षांचे मनोगत


श्री. अनिल भोंगळे
माननीय अध्यक्ष

प्रवरा ग्रामिण (बि.शे.) सहकारी पतसंस्था मर्या., रोहा.


माननीय अध्यक्षांचे मनोगत

सन्माननीय सभासद बंधु-भगिनी, सर्व ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक.

आपणाशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. सन १९९५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आज सहकार क्षेत्रात
स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या २२ वर्षाच्या सहप्रवासात प्रगतीचे अनेक टप्पे पार केले आहे. एका लहानशा
खोलीत चालू झालेली संस्था आज स्वमालकीच्या भव्य वास्तूत दिमाखात उभी आहे.

२५ कोटी ठेवी, २.१ कोटी वसुल भाग भांडवल, ९.७१ कोटी गुंतवणुक, ३.३६ कोटी इतका राखीव व इतर निधी, १९.६८ कोटी
कर्ज आणि ३० कोटी ९५ लाख खेळते भाग भांडवल व ५८० सभासद अशी दमदार वाटचाल संस्थेने केली आहे.
या प्रवासात आपण सर्व सभासद, ज्यांचा विश्वास हाच या प्रगतीचा खरा पाया आहे. ठेवीदार, कर्जदार, संस्थेचे कर्मचारी व सर्व
हितचिंतक यांची मोलाची साथ लाभली आहे. आपला विश्वास हा आमचा अमुल्य ठेवा आहे आणि तो जपण्यास आम्ही सदैव
कटीबध्द आहोत.

कोणत्याही पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्जवसुली हा महत्वाचा भाग असतो. या कर्जवसुलीकामी प्रवरा पतसंस्थेचे सर्व सभासद,
कर्जदार व विविध कंपन्यांमधील प्रशासन व संबंधित अधिकारी यांचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच
दरवर्षी ९९% पेक्षा जास्त कर्जवसुली करणे शक्य झाले आहे. या प्रवराच्या प्रगतीपथावर माझे सर्व आजी-माजी सहकारी संचालक,
ज्यांची कार्यक्षमता, क्रियाशीलता तसेच निस्वार्थी व निष्कलंक समाजमान्यता यांचे खूप मोलाचे योगदान लाभले आहे. त्या सर्वांचे
मी मनापासुन आभार मानतो आणि आपणा सर्वाकडून अशाच सहकार्याची आशा नम्रपणे व्यक्त करतो.

या संकेतस्थळाच्या निमित्ताने सर्व सन्माननीय सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतकांशी मनोगत साधण्याचा हा सस्नेह
अल्पसा प्रयत्न..!!

धन्यवाद....!!!!

dir2

manogat
प्रवरा ग्रा.स.पतसंस्था. © साईट वरील सर्व हक्क राखिव आहेत.