आकर्षक कर्ज योजना

endline

ठेव योजना
अधिक माहितीसाठी
इथे क्लिक करा.

आमच्या सुविधा - विविध कर्ज योजना
 

संस्थेच्या संचालक मंडळावर व कामकाजावर विश्वास ठेवून ग्राहकांनी आपल्या ठेवी संस्थेत ठेवल्या आहेत. या विश्वासाला संस्थेचे संचालक मंडळ सदैव बांधिल आहे. संस्थेच्या विविध कर्ज योजना पुढील प्रमाणे

विविध कर्ज योजना

१) सभासद कर्ज :- सभासदांना देण्यात येणारया कर्जाची मर्यादा रु. ७५,०००/- आहे. सदर कर्जाचा व्याजदर १२% असेल. यासाठी सभासदांची शेअर्स रक्कम कमीत कमी रु. २५,०००/- असली पाहीजे. शेअर्स रक्कम २५,०००/- कमी असेल तर सदर कर्जातुन उर्वरीत रक्कम कपात करुन घेण्यात येईल.

२) कंपनी स्किम कर्ज :- रोहा औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्याशी संस्थेने पगारकपातीच्या हमीवर कर्ज वितरण करण्याचा करार केला आहे. त्यानुसार सदर कंपन्यातील कायम कर्मचार्यांना जास्तीत जास्त २.५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते.

सदर कर्जाची परतफेड दरमहाच्या मासिक वेतनातुन संस्थेने ठरवुन दिलेल्या विहित हप्त्यानुसार करुन दयायची आहे. तसेच राजीनामा, निवृत्ती व इतर कारणास्तव कर्जदाराची कंपनीमधील नोकरी संपुष्टात आल्यास व्याजासहित रक्कम कर्जदारास मिळणारी ग्रच्युटी, प्रोव्हीडंट फंड, स्वेच्छानिवृत्ती व इतर मिळणारी रक्कम यातुन कपात करुन देण्यास कंपनी व्यवस्थापन बांधिल राहील.

कर्जदाराचे तीन पेक्षा जास्त हप्ते थकल्यास जामिनदारांच्या पगारातुन हप्ता कपात करुन घेतला जाईल.

३) ठेव तारण कर्ज :- आपल्या भविष्याची तरतुद म्हणुन ग्राहकांनी आपल्या संस्थेत ठेवी ठेवल्या आहेत. आपल्या ग्राहकांना काही अडचण आल्यास त्या प्रसंगी त्यांना ठेवीवर ठेव रक्कमेच्या ८०% कर्ज मिळु शकते. या कर्जाचा व्याजदर ठेवीवरील व्याजदरापेक्षा २% अधिक असेल. यासाठी ठेवीदाराला ठेव पावती / आर्वत ठेव पासबुक संस्थेमध्ये तारण ठेवावे लागेल.

४) शैक्षणिक कर्ज :- सभासदांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाकरीता संस्थेकडून रु. ७५,०००/- इतके कर्ज १३% व्याजदराने दिले जाते.

सभासद कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज यापैकी एकावेळी एकच कर्ज दिले जाते.

कर्ज अर्जास आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे (कर्जदार व जामिनदारांसाठी)

१) रेशनिंग कार्ड झेरॉक्स अथवा रहिवाशी दाखल्याबाबतचा पुरावा.
२) अर्जदाराचा १ फोटो
३) रु. ३०,००० पर्यंतचे कर्जास दोन जामिनदार व रु. ३०,००० चे वरील कर्जास तीन जामिनदार आवश्यक
४) एक साक्षीदार आवश्यक

५) अर्जदाराचे नावाचा रु.१०० चा स्टॅम्प पेपर
६) जामिनदारांपैकी एकाचे नावाचा रु.१०० चा स्टॅम्प पेपर
७) अर्जदाराची व सर्व जामिनदारांची चालू महिन्याची पगार स्लीप
८) कंपनी स्कीम कर्जाकरीता पगारातुन हप्ता कपातीबाबतचे कंपनीचे संमतीपञ

९) कंपनी स्कीम व्यतिरीक्त इतर सर्व कर्जास तारण आवश्यक (एल.आय.सी., एन.एस.सी. इत्यादी.)
१०) रोहा शहरातील बँका व पतसंस्थाचा ना हरकत दाखला. (फक्त वैयक्तिक कर्जासाठी)
११) पॅन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स

प्रवरा ग्रा.स.पतसंस्था. © साईट वरील सर्व हक्क राखिव आहेत.